श्री दत्तात्रेय आरती
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ।
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ जय देव
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची नकळे ही मात ।
पराही परतली कैसा हा हेत ।
जन्म मरणाचा पुरलासे अंत ॥ जय देव
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्मा मरणाचा फेरा चुकविला ॥ जय देव
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्त ध्यान ॥ जय देव
संत एकनाथ