दुर्गा आरती
दुर्गे दुर्घटभारी तुजवीण संसारी ।
अनाथ नाथे अम्बे करुणाविस्तारी ।
वारी वारी जन्म मरणांते वारी ।
हारी पडलो आता संकट नेवारी ॥ १ ॥
जय देवी जय देवी महिषासुरमथिनी ।
सुरवर ईश्वर वरदे तारकसंजीवनी ॥ धृ ॥
तुजवीण भुवनी पाहता तुज ऐसे नाही ।
चारी श्रमले परंतु न बोलवे काही ।
साही विवाद करिता पडले प्रवाही ।
ते तू भक्तालागी पावसि लवलाही ॥ २ ॥
प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा ।
क्लेशांपासुनी सोडवी तोडी भवपाशा ।
अम्बे तुजवाचून कोण पुरवील आशा ।
नरहरी तल्लीन झाला पदपंकजलेशा ॥ ३ ॥
- नरहरी सोनार