श्री गणेश आरती
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नांची ।
नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची ।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।
कंठी झळके माळ मुक्ताफळांची ॥
जय देव जय देव जय मंगल मूर्ती ।
दर्शनमात्रे मन कामनापूर्ती ॥ जय देव
रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा ।
चंदनाची उटी कुंकुम केशरा ।
हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।
रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया ॥ जय देव
लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ।
सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।
दास रामाचा वाट पाहे सदना ।
संकटी पावावे निर्वाणी रक्षावे
सुरवरवंदना ॥ जय देव
- समर्थ रामदासस्वामी